राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण रेल्वे कोर्टात हजर झालेत. त्यामुळं त्यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी कोर्टात सूनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे.

Updated: Apr 2, 2012, 02:43 PM IST

www.24taas.com, मुंबई 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण रेल्वे कोर्टात हजर झालेत. त्यामुळं त्यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी कोर्टात सूनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे भरती परिक्षांवेळी परप्रांतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या खटल्याच्या दोषारोपाची प्रत घेण्यासाठी राज ठाकरे कल्याण रेल्वे कोर्टात हजर झालेत. चार वर्षांपूर्वी रेल्वे भरतीच्या परिक्षेवेळी परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्य़ांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मारहाण केली होती. यावेळी  राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली होती त्यामुळं या प्रकरणात राज ठाकरेंना सहआरोपी करण्यात आलं होतं.

[jwplayer mediaid="76055"]