कापसाच्या प्रश्नावरून अधिवेशनात रणकंद

पहिल्या दिवसाप्रमाणं आज दुस-या दिवशीही नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही कापसाच्या मुद्यावर गाजतोय. आमदार पाशा पटेलांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Updated: Dec 13, 2011, 10:17 AM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 

पहिल्या दिवसाप्रमाणं आज दुस-या दिवशीही नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही कापसाच्या मुद्यावर गाजतोय.

 

कापूस दरावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांचा आक्रमक सूर कायम आहे. तर  शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीवरून कालपासून धरणावर बसलेल्या शेतक-यांनी आज नागपूरच्या मॉरिस कॉलेज चौकात सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. अधिवेशनात कापूस आणि  तमालाबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय.

 

भाजपचे आमदार पाशा पटेलांनी धान आणि सोयाबिनच्या भाववाढीसाठी विधानभवनाच्या पाय-यांवर बसून आंदोलन केलं. पटेलांनी धानाच्या पेंढ्या आणून त्या विधानभवनाच्या आवारातच पेटवून सरकारचा  निषेध केला. हे सरकार शेतक-यांच्या भावनांशी खेळतयं असा आरोप पाशा पटेल यांनी केलाय. 2.5 हेक्टर  धानाचं शेत पीकवण्यासाठी सरकारनं दिलेली मदत 5 रूपये 45 पै इतकी आहे. सरकारची ही मदत म्हणजे शेतक-यांची घोर चेष्टा  असल्याचंही पाशा पटेल यांनी म्हटंलय. या प्रकरणावरून त्यांना १ वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

 

दरम्यान,  शेतमालाचा भाव ठरविणारा कृषि मूल्य आयोग बरखास्त करण्याची मागणी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी केलीय. कापसाचा प्रति एकरी खर्च  जास्त असला तरी जुने निकष लावण्यात आल्यानं कापसाला अतिशय कमी भाव मिळत असल्याची तक्रारही त्यांनी केली. नागपुरच्या विधानभवनातील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ;ते बोलत होते.