नाशिकः कांदा व्यापाऱ्यांची मनमानी

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले असतानाच व्यापा-यांनी खरेदी-विक्री बंदचं हत्यार उगारलं आहे. कोट्यवधींची थकबाकी असलेल्या लेव्ही वसुलीच्या नोटीसा व्यापा-यांना जिल्हाधिका-यांनी बजावल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला.

Updated: Jan 9, 2012, 01:06 PM IST

www.24taas.com, नाशिक

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले असतानाच व्यापा-यांनी खरेदी-विक्री बंदचं हत्यार उगारलं आहे. कोट्यवधींची थकबाकी असलेल्या लेव्ही वसुलीच्या नोटीसा व्यापा-यांना जिल्हाधिका-यांनी बजावल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला.

कांद्याने रडवलं आणि व्यापा-यांनी सतावलं...अशा कोंडीत सध्या कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे. हमाल मापाडी यांच्या भल्यासाठी शासन व्यापा-यांकडून लेव्ही वसूल करत असते. खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर होणारी ही आकारणी व्यापा-यांनी अनेक वर्षांपासून भरलेली नाही.

पन्नासहून अधिक व्यापा-यांना याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी नोटीसा पाठवल्यात. मात्र ही लेव्ही न भरण्याची भूमिका घेत व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कांद्याचा भाव पाच रुपये किलोपर्यंत घसरल्याने शेतक-यांचा कांदा पडून आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा सडण्याच्या भीतीने शेतकरी हवालदील झालेत. शासनाचा महसूल चुकविणा-या व्यापा-यांनी आंदोलन पुकारत पुन्हा एकदा शेतक-यांना कोंडीत पकडलं, तर प्रशासनालाही वेठीस धरलं आहे.

[jwplayer mediaid="25757"]