शिवसेना-भुजबळ सामन्यात मनसेची भूमिका काय?

नाशिकच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक होतेय. यावेळी नाशिकमध्ये भाजप शिवसेना आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला काँग्रेस साथ देणार आहे. असं असलं तरी सामना शिवसेना विरुद्ध छगन भुजबळ असाच होणार असल्याच सांगण्यात येतंय.

Updated: May 24, 2012, 08:40 AM IST

मुकुल कुलकर्णी,www.24taas.com, नाशिक

नाशिकच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक होतेय. यावेळी नाशिकमध्ये भाजप शिवसेना आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला काँग्रेस साथ देणार आहे. असं असलं तरी सामना शिवसेना विरुद्ध छगन भुजबळ असाच होणार असल्याच सांगण्यात येतंय.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी नाशिक शिवसेना भाजप युतीचे पदाधिकाऱ्यांची एकत्र बसून खलबतं चालू आहेत. महापालिका निवडणुकीत युतीचा संसारच नको असं म्हणणारे आता युतीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या विजयासाठी रणनिती आखता आहेत. तर मनसेही सहाणेंच्या पारड्यात मतं टाकण्याच्या विचारात आहे. या संदर्भात मनसे नगरसेवकांची बैठकही झाली. आता राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे नगरसेवक आपली भूमिका जाहीर करणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झालेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत जाधव यांच्यासाठी भुजबळ यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. काँग्रेसनंही आघाडीचा धर्म पाळण्याचा शब्द दिलाय. शिवसेनेनं भुजबळविरोध हा एकमेव अजेंडा घेऊन अन्य पक्षांतूनही कुमक मिळवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. शिवसेनेचे भुजबळविरोध कार्ड चालले तर निवडणूक चुरशीची होणार असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.