प्राण्यांसाठी हायटेक स्मशानभूमी

प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालीकेनं एक स्मशानभूमी बनवली आहे. या स्मशानभूमीत आत्तापर्यंत सोळाशेपेक्षा जास्त पाळीव प्राण्यांचा अंत्यविधी करण्यात आला आहे. आता महापालिकेनं या प्राण्यांच्या दहनाकरिता विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: May 13, 2012, 10:56 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

 

मालकाची इमाने-इतबारे सेवा करणारा कुत्रा असो, मांजर असो किंवा इतर पाळीव प्राणी... त्याची घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सवय झालेली असते. घरात आल्याबरोबर त्याच्याशी खेळणं हा तर प्रत्येकाचा छंद असतो. पण घरातले हे प्राणी कधी आजारपणानं तर कधी वृद्धापकाळानं दगावतात. त्याचं दु:ख घरातल्या प्रत्येकालाच होतं पण, त्याहीपेक्षा त्याची आठवण कशी ठेवायची याची चिंता सगळ्यांना लागलेली असते.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनं प्राणी प्रेमींची ही चिंता दूर केली आहे. प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालीकेनं एक स्मशानभूमी बनवली आहे. या स्मशानभूमीत आत्तापर्यंत सोळाशेपेक्षा जास्त पाळीव प्राण्यांचा अंत्यविधी करण्यात आला आहे. आता महापालिकेनं या प्राण्यांच्या दहनाकरिता विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टेन्डरही मागवण्यात आलंय. त्यासाठी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

पालिकेच्या या उपक्रमाच प्राणी प्रेमिनीही स्वागत केलं आहे. प्राणी गेल्यानंतरही त्याची आठवण कायम राहावी, यासाठी पालिकेनं केलेला हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे. त्याची अंमलबजावणी योग्य व्हावी, हीच इच्छा सर्व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

व्हिडिओ पाहा :

 

[jwplayer mediaid="100369"]