राहुल गांधींचे अडीच तासांत दुष्काळ पर्यटन!

महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी साता-यात आले. राहुल गांधींनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. फक्त अडीच तासांत युवराजांनी दौरा आटोपला. तहानलेल्या महाराष्ट्राच्या व्य़था अवघ्या अडीच तासांत राहुल गांधींना कळल्या.

Updated: Apr 29, 2012, 09:34 AM IST

www.24taas.com, सातारा

महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी साता-यात आले. राहुल गांधींनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. फक्त अडीच तासांत युवराजांनी दौरा आटोपला. तहानलेल्या महाराष्ट्राच्या व्य़था अवघ्या अडीच तासांत राहुल गांधींना कळल्या.

दुष्काळग्रस्तांना पाणी नव्हे पण कोरडी आश्वासनं देण्यासाठी राहुल गांधींनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. या दौ-याची सुरुवात झाली ती सातारा जिल्ह्यताल्या माण तालुक्यातल्या जासी गावापासून.... जासी गावातल्या एका कोरड्या तलावाची पाहणी केल्यानंतर राहुलनी ग्रामस्थांशी अर्धा तास संवाद साधला. यावेळी माणला पाणी कधी देणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.

* फक्त अडीच तासांत आटोपला दुष्काळी भागाचा दौरा* कोरड्या आश्वासनांवर दुष्काळग्रस्तांची बोळवण

* अडीच तासांत राहुल गांधींना दुष्काळग्रस्तांच्या व्यथा कळल्या ?

जासीनंतर राहुल गांधींच्या दौ-यातलं पुढचं गाव होतं बिजवडी.... बिजवडीमध्ये राहुल गांधींनी शेततळ्यांची पाहणी केली आणि लगेच पुढचं गाव गाठलं. पांगरीमध्ये दुष्काळामुळे शेतक-यांची डाळिंबाची शेतं जळलीयत.

फक्त अडीच तासांत राहुल गांधींनी तीन गावांचा दौरा आटोपता घेतला आणि ग्रामस्थांना फक्त एक कोरडं आश्वासन देत बोळवण केली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेला राहुल गांधींचा दौरा साडे अकरा वाजता संपलासुद्धा.... युवराज हेलिकॉप्टरमधून आले आणि गेले... तहानलेला महाराष्ट्र युवराजांना अवघ्या अडीच तासांत कळला...