अनिल कुंबळेचा एनसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने नॅशनल क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कुंबळेने वेळेची कमतरता हे कारण राजीनाम्यासाठी दिलं आहे. कुंबळे कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी आहे तसंच तो आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्सचा मेंटॉरही आहे आणि त्याव्यतिरिक्त त्याची स्वताची टेनविक कंपनी देखली आहे.

Updated: Dec 12, 2011, 03:27 PM IST

झी २४ तास वेब टीम, बंगलोर

 

माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने नॅशनल क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कुंबळेने वेळेची कमतरता हे कारण राजीनाम्यासाठी दिलं आहे. कुंबळे कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी आहे तसंच तो आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्सचा मेंटॉरही आहे आणि त्याव्यतिरिक्त त्याची स्वताची टेनविक कंपनी देखली आहे. त्यामुळे कामात व्यस्त असल्याचं कारण देत त्याने राजीनामा दिला. पण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनुसार बीसीसीआयच्या दिग्गजांशी कुंबळेचे मतभेद झाल्याने त्याने राजीनामा दिला.

 

नॅशनल क्रिकेट अकादमीचा कारभार कसा चालावा या संदर्भात कुंबळेचे मतभेद झाले. अकादमी हे जखमी भारतीय खेळाडूंसाठी पुर्नवसन केंद्र झाल्याचं कुंबळेचे मत झालं आणि त्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रकरण व्हावं असं बीसीसीआयच्या वरिष्ठांचे मत आहे. कुंबळे एकाच वेळेला एनसीए तसंच कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशिएशन तसंच प्लेयर मॅनेजमेंट कंपनी चालवत असल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पण कुंबळेने याचा इन्कार केला होता. कुंबळेचा राजीनामा बीसीसीआयने स्वीकारला आहे.