किंग्ज इलेव्हन पंजाबचा विजय

मुंबई इंडियन्सने १६३ रन्स काढून किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर १६४ धावांचं आव्हान उभं केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब ने सुरूवात तरी चांगली केली आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये मुकाबला रंगला आहे.

Updated: Apr 23, 2012, 08:59 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई इंडियन्सने १६३ रन्स काढून किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर १६४ धावांचं आव्हान उभं केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब ने सुरूवात तरी चांगली केली आहे.  मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब  यांच्यामध्ये मुकाबला रंगला आहे. लसिथ मलिंगा दुखापतीमुळे मायदेशी परतल्यानं मुंबईला याचा चांगलाच फटका बसणार आहे.

 

आज मुंबई इंडियन्सच्या हाय प्रोफाईल टीमचा मुकाबला किंग्ज इलेव्हन पंजाबशी आहे. दोन्ही टीम्सना विजय आवश्यक  असल्यानं क्रिकेटप्रेमींना एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळत आहे. मुंबईच्या टीमच्य़ा बॅट्समननी दिल्लीविरुद्ध सपशेल निराशा केली होती. त्यामुळे या मॅचमध्ये याची कसर भरुन काढण्यास त्यांची टीम आतूर असणार आहे.

 

सचिन तेंडुलकरच्या कमबॅकमुळे मुंबई इंडियन्समध्ये उत्साह जाणवला. सचिनच्या कमबॅकमुळे मुंबईच्या टीममसाठी आत्मविश्वास वाढला आहे. पण आज सचिन जेमतेम २३ रन्स काढून तंबूत परतला.  लसिथ मलिंगाला पाठीच्या दुखापतीनं चांगलचं सतावलं असल्यानं, तो श्रीलंकेला परतला आहे. आणि याचा मोठा फटका मुंबईला बसणार आहे. मुंबईच्या टीमचा मलिंगा ट्रम्प कार्ड होता. आता तो नसल्यानं त्यांच्या बॉलर्सची चांगलीच कसोटी लागणार आहे.

 

दुसरीकडे मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानावरील बेताल वागण्यामुळे पंजाबची टीम चर्चेत आहे. टीमची मालकीण प्रीती झिंटानं अंपायरशी घातलेल्या हुज्जतीमुळे त्यांची टीम अधिक चर्चेत होती. आता, मागील सर्व  घडामोडी विसरत मैदानावर चमकदार कामगिरी करण्यासाठी त्यांची टीम प्रयत्नशील असेल. आता, स्टार क्रिकेटपटूंची मांदियाळी असलेली मुंबईची टीम बाजी मारते की, पंजाबची टीम मुंबईला पराभूत करण्याची किमया साधते याकडेच क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.