www.24taas.com, जोहान्सबर्ग
दक्षिण आफिकेच्या जॅक कॅलिस आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तुफान बॅटींग करून २२0 रन्सचा डोंगर उभा केला. मात्र, भारताने चांगली सुरूवात करताना बिनबाद ७१ धावा फटकावल्या. दरम्यान, अचानक पावसाने हजेरी लावल्याने भारताच्या विजयावरच पाणी पडले. डकवर्थ लुईस नियमानुसार ११ धावांनी पराभव पत्करावा लागला.
२२0 रन्सचा पाठलाग करताना ७.५ षटकांत ९.0६ धावांच्या सरासरीने नाबाद ७१ पर्यंत मजल मारली. पावसाने गौतमने २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने नाबाद ४९ धावा केल्या होत्या. रॉबिन उथप्पा १८ धावांवर नाबाद होता. भारताला सूरसापडायला सुरुवात झालेली असताना भारतीय फलंदाजांना पावसाने दगा दिला. पाऊस सुरू झाला तेव्हा भारतीय संघाच्या ७.५ षटकांत नाबाद ७१ धावा झाल्या होत्या. तेव्हा डकवर्थ लुईस पद्धतीने त्यांना बरोबरीसाठी ८२ धावांची आवश्यकता होती. मात्र फटकेबाजी करणाऱ्या भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार ११ धावांनी पराभव पत्करावा लागला.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या गोलंदाजीचे बारा वाजवत जॅक कॅलिस आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तुफानी अर्धशतके ठोकली. त्यामुळे एकमेव टी-२0 लढतीत दक्षिण आफ्रिकेने ४ बाद २१९ धावांचा डोंगर रचला होता. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना स्थायिक होऊन दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या लढतीचे येथील वंडर्स स्टेडियमवर आयोजन करण्यात आले होते.
संबंधित बातमी