'विराट' खेळी, भारताला मिळाला दुसरा सचिन?

विराट कोहली सध्या टीम इंडियाच्या मॅचविनरची भूमिका चोखपण पार पाडतो आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन-डेतही त्यानं आपल्या करिअरमधील १३ वी सेंच्युरी ठोकत भारताला शानदार विजय साकारुन दिला.

Updated: Aug 1, 2012, 10:21 AM IST

www.24taas.com, कोलंबो

 

विराट कोहली सध्या टीम इंडियाच्या मॅचविनरची भूमिका चोखपण पार पाडतो आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन-डेतही त्यानं आपल्या करिअरमधील १३ वी सेंच्युरी ठोकत भारताला शानदार विजय साकारुन दिला. त्यामुळेच भारताचा सध्याच्या घडीला विराटच बॅट्समन नंबर वन आहे असचं म्हणावं लागणार आहे. विराट कोहली.... भारतीय बॅटिंगचा प्रमुख आधारस्तंभ....

 

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचं जवळपास प्रत्येक मॅचमध्ये यशस्वी होणार ट्रम्प कार्ड.... श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या  वन-डेतही त्यानं आपला फॉर्म कायम राखत टीम इंडियाला आणखी एक सीरिज विजय मिळवून दिला. कोहलीचा धडाका पाहात त्याला रोखण अशक्य आहे. आपल्या बॅटिंग टॅलेंटनं त्यानं क्रिकेटजगतामध्ये आपलं एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. धोनीच्या यंगिस्तान टीमचा हा ऑल टाईम हिट बॅट्समन भारतीय टीमच्या तारणहाराची भूमिता बजावतो आहे. टीम इंडिया अडचणीत सापडते आणि कोहली आपल्या शानदार बॅटिंगनं टीमला तावून-सुलाखून बाहेर काढतो हे आता समीकरण बनलं आहे.

 

विराट कोहलीनं वन-डेमधील १३ वी सेंच्युरी झळकावली. त्यानं ११९ बॉल्समध्ये नॉटआऊट १२८ रन्सची इनिंग खेळली. यामध्ये १२ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. विराट कोहलीनं आपल्या बॅटिंगनं क्रिकेटविश्वावाला याधीच दखल घ्यायला भाग पाडली होती. त्यानं गेल्या ८ मॅचेसमध्ये ५ सेंच्युरीज झळकावण्याची किमयाही साधली आहे.