IPL: लालूंच्या मुलाला न खेळता ४० लाख

माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलाला आयपीएलची कृपा झाली आहे. त्याला सामना न खेळता ४० लाख रूपये मानधन मिळाले आहे. लालूंचा मुलगा तेजस्वी यादव हा दिल्ली डेयरडेविल्सच्या संघात आहे.

Updated: Mar 29, 2012, 04:49 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलाला आयपीएलची कृपादृष्टी झाली आहे. त्याला सामना न खेळता ४० लाख रूपये मानधन मिळाले आहे. लालूंचा  मुलगा तेजस्वी यादव हा दिल्ली डेयरडेविल्सच्या संघात आहे. तेजस्वी हा २० वर्षांचा आहे.

 

 

तेजस्वी आतापर्यंत एकच रणजी सामना खेळला आहे. विदर्भाविरोधात त्याने दुसऱ्या सामन्यात १९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो दोन एकदिवसीय सामने व चार ट्‌वेंटी-20 सामने खेळला आहे. आयपीएलचे सामने सुरू झाल्यापासून दिल्ली डेयरडेविल्सच्या संघामध्ये तेजस्वीचा समावेश असला तरी तो एकही सामना खेळलेला नाही. मात्र, असे असले तरी तो संघातील सदस्य असल्यामुळे त्याला मानधन द्यावे लागले आहे.

 

 

आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही सामना न खेळलेले खेळाडू आहेत. यात प्राणुख्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव निरंजन शाह यांचा मुलगा जयदेव शाह याचा समावेश आहे, जयदेव  सुद्धा राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स व डेक्कन चार्जर्सचा सदस्य होता. त्याने  एकही सामना खेळलेला नाही.