पोलिसाला मार, आमदारांना कोठडी,आमदाराला मार, पोलिसांना बढती

राज्यात कायद्याचे राज्य आहे कायद्याचं असे उर बडवून फिरणाऱ्या राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अजब कारभार उघड झाला आहे. पोलिसाला चोप देणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले, पण आमदारांना लाठ्याकाठ्यांनी झोडपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बढती दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 25, 2013, 11:40 AM IST

www.24taas.com, मुंबई
राज्यात कायद्याचे राज्य आहे कायद्याचं असे उर बडवून फिरणाऱ्या राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अजब कारभार उघड झाला आहे. पोलिसाला चोप देणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले, पण आमदारांना लाठ्याकाठ्यांनी झोडपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बढती दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी क्षितिज ठाकूर आणि राम कदम या दोन आमदारांना पोलिसांनी जेलमध्ये टाकले. कलम ३५३ च्या किरकोळ गुन्ह्यात आमदारांवर एवढी कठोर कारवाई करणार्याय महाराष्ट्र पोलिसांनी कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना अमानुष मारहाण करणार्‍या सात पोलिसांवर कारवाई करताना मात्र दुटप्पी भूमिका घेतली आहे.
या सर्व पोलिसांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक तर झाली नाहीच शिवाय ३०७ चे आरोपी असणार्याद मारकुट्या पोलीस अधिकार्यांचना पदोन्नती देऊन सरकारने त्यांना आमदारांच्या मारहाणीचे इनामच दिले आहे.
गृहखात्यामधील या विचित्र कारभारामुळे सर्वपक्षीय आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना आमदारांनी विधिमंडळाच्या आवारात केलेल्या मारहाणीवरून पोलीस दलाने दंडुके आपटून आमदारांवर कठोर कारवाई सुरू केली.
तथापि खाकी वर्दीच्या जोरावर गुंडगिरी करणार्या पोलिसांविरुद्ध मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आणि प्रसारमाध्यमेही त्याविरुद्ध कधी गळा काढताना दिसत नाहीत. कन्नड येथील मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या भयंकर मारहाणीचे प्रकरण पुरेसे बोलके आहे.
५ जानेवारी २०११ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेरुळच्या दौर्यासवर आले होते. यावेळी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गारपीटग्रस्त शेतकर्यां ना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी आमदार जाधव यांची गाडी अडवली. गाडीवर विधानभवनाचे बोध चिन्ह होते. विधानसभा सदस्य असाही उल्लेख गाडीवर होता. तरीही पोलिसांनी आमदार जाधव यांची गाडी अडवली आणि दहा ते पंधरा पोलिसांनी घेरून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रत्नपूर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मी, आमदार आहे, असे हर्षवर्धन जाधव ओरडून सांगत होते. तरीही पोलीस अधिकार्‍यांनी आमदार जाधव यांना लाठ्या-काठ्यांनी तर मारहाण केलीच शिवाय लाथा मारून बुटानेही तुडवून काढले.
विधिमंडळात या प्रकरणाचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली. त्यानुसार ७ पोलीस अधिकारी व कर्मचार्यां्वर कलम ३०७ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु एवढा गंभीर गुन्हा दाखल होऊनही यापैकी एकाही पोलीस अधिकार्यााची साधी चौकशीही आजवर झालेली नाही.
१५ दिवसांत निलंबन मागे
अभिमन्यू पवार आणि सूर्यकांत कोकणे या दोन पोलीस अधिकार्यांहना निलंबित करण्यात आले. परंतु पंधरा दिवसांच्या आतच या अधिकार्यां वरील निलंबनाची कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आले. एका आमदाराच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊनही राज्याचे गृहखाते पोलिसांना वाचविण्यासाठी धरपड करीत राहिले.

पोलीस अधिकाऱ्यांना बढती
आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी संभाजीनगरचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, पोलीस निरीक्षक अभिमन्यू पवार, गंगापूरचे पोलीस उपअधीक्षक शिवराज पाटील, बिडकीनचे पीएसआय सूर्यकांत कोकणे, गंगापूरचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, एपीआय घनश्याम पाळवदे आणि कॉन्स्टेबल वाय.जी. हरणे या अधिकारी-कर्मचार्यांावर कलम ३०७ म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला आता २ वर्षे उलटली तरी अद्याप या पोलीस अधिकार्यांतवर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही यापैकी काही अधिकाऱ्यांना आमदाराला केलेल्या मारहाणीचे बक्षीस म्हणून गृहखात्याने झटपट पदोन्नती दिली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक चावरिया यांना औरंगाबाद पोलीस उपायुक्त म्हणून, फौजदार कोकणे यांना एपीआय म्हणून, एपीआय पाळवदे यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली. या प्रकरणातील आरोपी असलेले कॉन्स्टेबल वाय.जी.हरणे हे यापूर्वी लाचखोरीच्या एका प्रकरणात अडकले होते, असे असतानाही हरणे यांनाच आता अँटीकरप्शन विभागात नेमणूक देऊन आमदारांच्या मारहाणीची शाबासकी देण्यात आली आहे.