www.24taas.com, मुंबई
हैदराबादला बॉम्बस्फोट घडवून आणताना इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं सुनियोजित योजना आखली होती. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या तेराव्याला (मृत्यूनंतर १३व्या दिवशी) हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या योजनेचं नाव होतं... `मिशन देशमुख`.
या स्फोटादरम्यान इंडियन मुजाहिद्दीननं फेसबूकचाही वापर केला होता. बॉम्बस्फोटाच्याच दिवशी या दहशतवादी संघटनेनं ‘सेटअप बॉम्ब विस्फोट देशमुख हैदराबाद मिशन कम्लिट इंडियन मुजाहिद्दीन’ (Set Up Bomb visfot deshmukh hyderabad mission complete Indian mujahideen) या नावानं एक फेसबूक पेजही तयार केलं होतं. या स्फोटाला दहशतवाद्यांनी मिशन `DESHMUKH ` (देशमुख) असं नाव दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर येतेय. हे फेसबुक पेज कोणी टाकलं, ते कुठून टाकण्यात आलं, याबद्दल तपास गुप्तचर यंत्रणा करीत आहेत. मात्र, याबाबत गुप्तचर यंत्रणा काहीही बोलण्यास तयार नाहीत.
मिशन `DESHMUKH `...
D- दिलसुखनगर
E- ईस्ट
S- साऊथमधील
H- हैदराबाद
M- मुजाहिद्दीन , इंग्रजी अल्फाबेटिकलमध्ये ` एम ` शब्द १३ व्या क्रमांकावर आहे
U- हा शब्द २१ व्या क्रमांकावर येत असल्याने २१ ही तारीख निश्चित करण्यात आली .
K- कोणार्क अथवा कोतापेठ
H - दिलसुखनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर आहे. लोकेशनसाठी `हायवे` चा ‘एच` दर्शविण्यात आलाय.
संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरु याच्या फाशीचा बदला घेण्याची धमकी या संघटनेनं अगोदरच दिली होती आणि ही धमकी प्रत्यक्षात आणत गुरुच्या मृत्यूच्या १३ व्या दिवशी दिलसुखनगर येथे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. दिलसुखनगर येथील अत्यंत गजबजलेल्या कोणार्क थिएटर अथवा कोतापेठ बाजारात हा स्फोट घडविण्याची त्यांची योजना होती. मात्र, वेळ चुकल्यानं दुसऱ्याच ठिकाणी स्फोट झाला.
दिलसुखनगर येथीला बॉम्बस्फोटाची जबाबदारी `लष्कर ए तोयबा` या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतू इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेनंच हे कृत्य केलाचा दाट संशय गुप्तचर यंत्रणांना आहे.