दादांच्या धाडसामागे मंत्रालयातील आग- उद्धव

हजारो कोटांच्या घोटाळ्याचे आरोप असूनही अजित पवारांचे मनमोकळेपणाने फिरण्याचे धाडस होतेच कसे, या धाडसाचा मंत्रालयाला लागलेल्या आगीशी तर संबंध नाही ना असा सनसनाटी आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 3, 2012, 09:12 PM IST

www.24taas.com, मुंबई
हजारो कोटांच्या घोटाळ्याचे आरोप असूनही अजित पवारांचे मनमोकळेपणाने फिरण्याचे धाडस होतेच कसे, या धाडसाचा मंत्रालयाला लागलेल्या आगीशी तर संबंध नाही ना असा सनसनाटी आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय.

रिपब्लिकन पक्षाचा 55वा वर्धापन दिन मुंबईत साजरा करण्यात आला. यावेळी रामदास आठवले, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसंच भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे त्रिकुट पुन्हा एकदा व्यासपीठावर एकत्रित पहायला मिळालं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या इंदूमिलची जागा लवकरात लवकर मिळावी अन्यथा रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दिलाय.

याबाबत 14 ऑक्टोबरची डेडलाईन सरकारला देण्यात आलीये. 14 ऑक्टोबरपर्यंत जागा ताब्यात द्यावी, अन्यथा 15 ऑक्टोबरपासून जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आठवलेंनी दिलाय.