www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पीटलच्या उदघाटनाचा वाद शिगेला पोहचलाय. हॉस्पिटलच्या श्रेयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू झालाय. नेमका उद्घटनाच्या तारखेवरून वाद निर्माण झाल्यानं हॉस्पीटलच्या डीननं मात्र चांगलाच धसका घेतलाय.
या हॉस्पीटलचं उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी उद्घाटन करणार होते तर मुख्यमंत्र्यांनी उदघटनासाठी पाच ऑक्टोबरची तारीख दिली आहे. या वादाचा धसका अधिकाऱ्यांनी घेतला असून आयुक्त रजेवर गेले आहेत. हॉस्पीडलचे डीन डॉ. के. एस. भोपळे यांचातर यामुळे रक्तदाब वाढलाय. त्यांना आयसीय़ूत दाखल करण्यात आल्याचं समजतंय. तर जिल्हाधिकारी कुणालकुमार ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर निघून गेल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आज उद्धाटन होणार का? हा प्रश्न दुपारपर्यंत कायम होता. मुख्यमंत्री अजितदादांना कालपासून संपर्क साधत असून अजितदादा मात्र नॉट रिचेबल आहेत. या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वादात मात्र वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांची गोची झालीय.