`पुळचट मुख्यमंत्री, अजितदादा मुख्यमंत्री होणारच`

`असले पुळचट मुख्यमंत्री काय कामाचे, त्यापेक्षा आमच्या अजितदादांकडे पाहा`. `निर्णय घेण्याची क्षमता नसलेले पुळचट मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत.

Updated: Nov 6, 2012, 09:10 AM IST

www.24taas.com, नांदेड
`असले पुळचट मुख्यमंत्री काय कामाचे, त्यापेक्षा आमच्या अजितदादांकडे पाहा`. `निर्णय घेण्याची क्षमता नसलेले पुळचट मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. असे पुळचट मुख्यमंत्री काही कामाचे नाहीत`, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा टार्गेट केलं. मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमताच नाही. त्यापेक्षा आमच्या अजितदादांकडे पाहा जरा कसे निर्णय घेतात. असा घणाघाती हल्ला पिचडांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर केला आहे. तर दुसरीकडे पिचडांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचाही समाचार घेतला.
आपल्या भाषणात पिचड मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले, महत्त्वाच्या वेळी योग्य ते निर्णय ज्यांना घेता येत नाहीत, असे पुळचट पृथ्वीराज हे मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. मुख्यमंत्री असावा तर अजित पवारांसारखाच आणि आम्ही मुख्यमंत्री पदावर त्यांना बसवून दाखवू, असे पुळचट मुख्यमंत्री काही कामाचे नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
पिचड यांनी आपल्या भाषणात माणिकराव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आम्हाला गुंड म्हणून संबोधणार्‍या माणिकरावांना जिल्ह्याचा ‘आदर्श’ नेता दिसला नाही काय? घोटाळ्यामुळे त्यांना घरी जावे लागले, असे मंत्री दिसले नाहीत काय? आम्ही गुंड आहोत, तर मग सत्ता सोडा, कशाला सोबत करता.