नगरपालिकांवर काँग्रेसचाच झेंडा

राज्यात काल झालेल्या 10 नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलंय. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारलीय. शिवसेना, मनसे आणि भाजपचा या निवडणुकीत धुव्वा उडालाय. नंदूरबार, नवापूर, तळोदा आणि यवतमाळ जिलह्यातली पांढरकवडा या 4 नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 5, 2012, 10:42 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज्यात काल झालेल्या 10 नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलंय. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारलीय. शिवसेना, मनसे आणि भाजपचा या निवडणुकीत धुव्वा उडालाय. नंदूरबार, नवापूर, तळोदा आणि यवतमाळ जिलह्यातली पांढरकवडा या 4 नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय.
ठाणे जिल्ह्यातल्या डहाणू, जव्हार आणि अमरावती जिल्ह्यातली चिखलदरा या 3 नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आलीय. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीची सत्ता शिवसेनेनं राखलीय. तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपच्या सत्तेला सुरुंग लागलाय. या ठिकाणी मनसेचे सहा नगरसेवक निवडून आलेत.
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट नगरपालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून राष्ट्रवादीनं 17 पैकी आठ जागा जिंकल्या आहेत. 10 नगरपालिकांच्या एकूण 199 जागांपैकी काँग्रेसला 90 राष्ट्रवादीला 65, शिवसेनेला 22 तर भाजप आणि मनसेला प्रत्येकी 6 जागांवर समाधान मानावं लागलंय.