www.24taas.com, झी मीडिया,बुलडाणा
लग्नाचे आमीष दाखवून सतत दोन वर्ष बलात्कार करून एका घटस्पोटीत महिला पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक सहकारी पोलीस कर्मचाऱ्यानेच केल्याची खळबळ जनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उघडकीस आली आहे.
बुलडाणा जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारी यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत आपली फसवणू झाल्याचे म्हटले आहे. खामगाव पोलीस स्टेशनल कार्यरत असलेल्या पंकज सीताराम तायडे या पोलीस कर्मचाऱ्याने मला लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्ष माझ्याशी शारीरिक सबंध ठेवले. मागील वर्षी मला पंकज तायडेपासून दिवस सुद्धा राहिले. परंतु त्याने जबरदस्तीने माझा गर्भपात करून घेतला. ज्या वेळी मी त्याला लग्नाचे विचारले तर त्याने नकार देत दुसऱ्या महिलेशी लग्न केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
पिडित महिलेने मेहकर पोलीस स्टेशनला तायडे विरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी तायडे विरुद्ध विवीध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. पंकज तायडे याची उपनिरीक्षक पदी निवड झाली असून सध्या तो नाशिक येथे प्रशिक्षण घेत आहे. पिडीत महिला पोलीस कर्मचारी हि घटस्पोतीत आहे, असल्याचे सांगण्यात आलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.