www.24taas.com, झी मीडिया,जळगाव
भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे कुटुंबीयांचे सांत्वन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन केले. यावेळी राज यांच्याबरोबर आमदार आणि गटनेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.
एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. निखिल यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान दु:खावेगामुळे एकनाथ खडसेंची मोठी बहिण कमलाबाई पाटील (७४) यांचेही निधन झाले. त्यामुळे आधीच पुत्राच्या वियोगाने दु:खी असलेल्या एकनाथ खडसेंवर नियतीने दुसरा आघात केला.
एकनाथ खडसेंवर नियतीने दु:खाचा डोंगर कोसळला. खडसेंचे सांत्वन करण्यासाठी राज ठाकरे यांनी जळगाव येथील खडसेच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी राज यांनी खडसेंना धीर दिला. खडसेंनी राज यांच्याबरोबर आपले दु:ख बोलून हलके केले.
दरम्यान, दुष्काळग्रस्त भागाचा दौरा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज यांनी राज्य सरकारवर हल्लोबोल चढवला. दुष्काळग्रस्तांना मदत देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जबाबदार आहे. त्यांच्या अक्षम्य चुकीमुळे दुष्काळग्रस्त अनेक गोष्टींचा सामना करीत आहेत, अशी टीका राज यांनी यावेळी केली.