www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
३१ डिसेंबरला पार्ट्यांमध्ये धिंगाणा घालणा-यांवर कारवाई करण्यासाठी सरकर विविध उपाय योजत असते. मात्र सरकार चालवणारे लोकप्रतिनिधीच ३१ डिसेंबरला नियम धाब्यावर बसवून पार्ट्यांमध्ये राडा करत असतील त्यांचे काय? असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये ३१ डिसेंबरलाच्या रात्री घडलीय. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे गटनेते संजय केनेकर ३१ डिसेंबरला आमनेसामने आले. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने जोरदार राडा झाला. हे दोन्ही नेते भिडल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि महापालिकेतील भाजपचे गटनेते संजय केनेकर यांच्यात ३१ डिसेंबरच्या पार्टीत एका हॉटेलमध्ये तुफान हाणामारी झालीय. दोघांनी एकमेकांना जबर मारहाण केली असली तरी या घटनेचा दोघांनीही इन्कार केलाय. मात्र खाजगीत खैरे आणि केनेकर यांनी यांनी या घटनेला दुजोरा दिलाय.
३१ डिसेंबरच्या पार्टीत केनेकर यांनी एका प्रथितयश महिलेला बळजबरीनं नाचायला भाग पाडल्यामुळं शिवसैनिक संतप्त झाल्याचा दावा खैरेंनी केलाय. तर भाजपनं महापौरांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा राग आल्यानंच खैरेंनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केनेकर यांनी केलाय.
या पार्टीतल्या राड्याला काहीही कारण असले तरी औंरगाबादमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमधील धुसपूस पुन्हा एकदा समोर आली आहे. मात्र यावेळेस हातापाईवरच उतरल्यानं मतभेदाचं टोक गाठल्याचं चित्र दिसतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ