www.24taas.com, झी मीडिया, जळगाव/औरंगाबाद
जळगाव जिल्यात वादळी वा-यासह पाऊसाने हजेरी लावली खरी मात्र या वादळी पाऊसामुळे चार जण ठार झाले. तसच केळीच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. ३५ ते ४० घराचंही नुकसान झालंय. तर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे नुकसान झालेय.
चोपडा, पारोळा, मुक्ताईनगर पाचोरा, जळगाव या तालुक्यात मोठ नुकसान झालंय. नाशिराबाद येथील नाजीयाबी शेख यांचा डोक्यावर पत्रा आणि दगड पडल्याने मृत्यू झालाय. पाचोरा तालुक्यातील वेरुळी येथील जाणा पाटील, मुक्ताईनगर येथील चिंचखेडा येथील मीराबाई पाटील, यांचा वीज कोसळून मृत्यू झालंय. तर मुक्ताईनगर, चोपडा, रावेर तालुक्यात वादळी वा-यामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही गावांत बुधवार अणि गुरुवारी जोराच्या वारा अणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे चांगलंच नुकसान झालंय. अडगाव अंधारी गाव तसंच कन्नड तालुक्यातल्या गावांना हा फटका बसलाय.
अडगाव अंधारी गावात अनेक झाडं कोलमडली तर वीजेचे खांब पडल्यानं गावात जवळपास १० दिवस तरी वीज पुरवठा होऊ शकणार नाही. या गावात वादळानं घातलेल्या थैमानात गावातल्या अनेक घरांची पत्रं उडून गेली. अनेक घरातील काही भाग कोसळल्यानं काही महिला देखील जखमी झाल्यायत. या वादळामुळे बरंच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.