www.24taas.com, मुंबई
उत्तम प्रकृतीसाठी रात्री ६-८ तास झोपणं आवश्यक असतं. तसं न झाल्यास नंतर दिवसभर सुस्ती राहाते. तब्येत बिघडण्याची शक्यता असते. काहीजणांना अनेक कारणंमुळे शांत झोप लागत नाही. बऱ्याचजणांना वाईट आणि भीतीदायक स्वप्नं पडत असल्यामुळे शांत झोप लागत नाही.
जर रात्री अपरात्री झोपेमध्ये भूत-प्रेत वा इतर भयावह स्वप्नं पडत असतील आणि त्यामुळे झोपेतून दचकून जागं व्हायला होत असेल तर हे निश्चितच चांगलं लक्षण नाही. सततच्या भीतीदायक स्वप्नांमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. यापासून मुक्ती मिळवायला ज्योतिषशास्त्रात काही तोडगे सांगितले आहेत.
रात्री झोपण्यापूर्वी पलंगाखाली पोळ्यांचा तवा उपडा ठेवावा. या तव्यामुळे खोलीतील नकारात्मक शक्तींचा प्रादुर्भाव कमी होतो. वातावरणातील नकारात्मक शक्तींमुळेच आपल्या मनावर परिणाम होत असतात. झोपेत याच गोष्टींचा प्रभाव पडून भयावह स्वप्नं पडत असतात. याशिवाय उशाखाली सुरी घेऊन झोपण्याची जुनी पद्धत आहे. उशाखाली सुरी ठेवल्यामुळेही भयानक स्वप्नं पडणं बंद होतं. उपडा तवा किंवा सुरी उशाखालीयपलंगाखाली असेल, तर दुःस्वप्नांना विराम मिळतो. मन शांत होतं आणि झोप चांगली लागते. याशिवाय देवाचं नामस्मरण करून झोपण्याची पद्धत तर नक्कीच उपयोगी पडणारी आणि सोपी आहे.
.