नवी दिल्ली : हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो. यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते. शास्त्रानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड आहे तर या गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी. संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा.
तुळशीचे झाड लावल्यानंतर सुकून गेल्यास असे झाड घरात ठेवू नका. ते लगेच नदी अथवा तलावात प्रवाहित करा आणि दुसरे झाड आणून लावा.
रात्रीच्या वेळेस कधीही तुळशीची पाने तोडू नका.
तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे घरात सुख-शांती वास करते.
तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत. तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.