बेडरुममध्ये देव का नसावा?

आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे दिवाणखान्यात म्हणजेच बेडरुममध्ये देवाची मुर्ती अथवा कुठलीही प्रतिमा लावू नये. मात्र महिला गर्भार असतील, तर त्यांच्या शयनगृहात बाळगोपाळाची प्रतिमा लावण्यास मान्यता आहे

Updated: Dec 14, 2011, 04:01 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे दिवाणखान्यात म्हणजेच बेडरुममध्ये देवाची मुर्ती अथवा कुठलीही प्रतिमा लावू नये. मात्र महिला गर्भार असतील, तर त्यांच्या शयनगृहात बाळगोपाळाची प्रतिमा लावण्यास मान्यता आहे. देव तर ‘यत्र तत्र सर्वत्र’ आहे, तर बेडरुममध्ये देवतांची चित्रं न लावण्यचं नेमकं कारण काय?

 

देवाची प्रतिमा बेडरुममध्ये न लावण्याचं कारण म्हणजे अर्थातच जोडप्याचं वैयक्तिक जीवन हेच होय. बेडरुममधील काळ आपण आपल्या जोडीदारासोबत व्यतित करतो. बेडरुममधील महत्वाची गोष्ट म्हणजे जोडप्यामधील सेक्स. अशावेळी बेडरुममध्ये देवतांच्या प्रतिमा असतील, तर त्या गोष्टीचा आपोआप मानसिक दबाव निर्माण होतो. शारीरिक संबंधांदरम्यान कदाचित मनामध्ये अचानक देवाची प्रतिमा पाहून मनातले विचार बदलून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे संसारातील शांतता भंग होऊ शकते. म्हणूनच, देवाची प्रतिमा ही देवघरात असावी, बेडरुममध्ये नाही.

 

 जर, महिला गर्भवती असेल, तर गर्भातील बाळावर तचांगले संस्कार व्हावेत यासाठी दिवाणखान्यात बाळगोपाळची प्रतिमा ठेवली जाते. बाळगोपाळाची प्रतिमा डोळ्यांसमोर असली तर गर्भवती महिलेच्या चित्तवृत्ती शात राहातात. वाईट विचार येत नाहीत. एक प्रकारचं संरक्षण जाणवतं आणि कुठलीही भीती वाटत नाही. मातेची मनःस्थिती चांगली असेल, तर बाळाच्या विकासात फायदा होतो. म्हणून केवळ गर्भवती महिलांच्या बेडरुममध्ये बाळगोपाळ विराजमान असतात.