अजितदादा आणि राज ठाकरे भेटतात तेव्हा....!

२३ फेब्रुवारी २०१७ ला संध्याकाळपर्यंत पिंपरी चिंचवड च्या क्षितिजावर कायम चमकत राहणाऱ्या घडयाळाचे काटे निखळून पडले...! कुठून ही पाहिलं तरी तेजपुंज दिसणारे ते चमचमते घडयाळ आज अंधारात लुप्त झाले...आणि क्षितिजावर कमळाचा उदय झाला...! अनेकांचा विश्वास बसत नसला तरी तसं घडलं होते... गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड नगरीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणाऱ्या अजितदादांना जनतेने पायउतार केले....! दादांच्या पिंपरी महालातून सामानाची आवरा आवर सुरु झाली....! तिकडे नाशिक नगरीत ही ठाकरे राजाचा पराभव झाला होता...! नाशिक नगरीत अगदी दणक्यात धावणाऱ्या रेल्वे इंजिनाची धडधड बंद बंद झाली...! नाशिकच्या महालातून ही ठाकरेंच्या राज च्या सामानाची आवरा आवर सुरु झाली...! सामानाची आवरा आवर सुरु असताना अजित यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यासमोरून सगळा भूतकाळ सरकू लागला.... पिंपरी चिंचवड.... भोवताली काही खेडी ...त्यांना एकत्र करून बनलेली ही नगरी... त्या नगरीत २५ वर्षापूर्वी दाखल झालो...! नगरीच्या राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक स्थानिक सरसेनापती निवडले.... बगता बगता नगरीचे रूप पालटले.... राज्यातच नाही पण देशात हेवा वाटावं अशी नगरी निर्माण केली...!  कोणालाही हेवा वाटावे असे उड्डाणपूल, रस्ते अरे काय नाही केले नगरीसाठी. पण हा पराभव...!

Updated: Feb 25, 2017, 02:44 PM IST
अजितदादा आणि राज ठाकरे भेटतात तेव्हा....!    title=

कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : २३ फेब्रुवारी २०१७ ला संध्याकाळपर्यंत पिंपरी चिंचवड च्या क्षितिजावर कायम चमकत राहणाऱ्या घडयाळाचे काटे निखळून पडले...! कुठून ही पाहिलं तरी तेजपुंज दिसणारे ते चमचमते घडयाळ आज अंधारात लुप्त झाले...आणि क्षितिजावर कमळाचा उदय झाला...! अनेकांचा विश्वास बसत नसला तरी तसं घडलं होते... गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड नगरीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणाऱ्या अजितदादांना जनतेने पायउतार केले....! दादांच्या पिंपरी महालातून सामानाची आवरा आवर सुरु झाली....! तिकडे नाशिक नगरीत ही ठाकरे राजाचा पराभव झाला होता...! नाशिक नगरीत अगदी दणक्यात धावणाऱ्या रेल्वे इंजिनाची धडधड बंद बंद झाली...! नाशिकच्या महालातून ही ठाकरेंच्या राज च्या सामानाची आवरा आवर सुरु झाली...! सामानाची आवरा आवर सुरु असताना अजित यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यासमोरून सगळा भूतकाळ सरकू लागला.... पिंपरी चिंचवड.... भोवताली काही खेडी ...त्यांना एकत्र करून बनलेली ही नगरी... त्या नगरीत २५ वर्षापूर्वी दाखल झालो...! नगरीच्या राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक स्थानिक सरसेनापती निवडले.... बगता बगता नगरीचे रूप पालटले.... राज्यातच नाही पण देशात हेवा वाटावं अशी नगरी निर्माण केली...!  कोणालाही हेवा वाटावे असे उड्डाणपूल, रस्ते अरे काय नाही केले नगरीसाठी. पण हा पराभव...!

तिकडे ठाकरेंच्या राजांनी ही डोळे मिटले आणि विचार करू लागले, त्यांच्या ही डोळ्यापुढून भूतकाळ सरकू लागला... अरे अपमानास्पद वागणुकीमुळं सेनेच्या मोठ्या महालातून बाहेर पडलो...! देवाला सोडण्याचे दु:ख पचवल...मोजक्या लोकांच्या जीवावर लढाईत उतरलो... केवळ साथ देणाऱ्या शिलेदारांच्या जीवावर ही नाशिक नगरी पादाक्रांत केली... सुरुवातीला जमलं नसलं तरी शेवटच्या टप्प्यात नाशिकचा हेवा वाटावा असा विकास साधला. तरीही पराभव... पराभवाचा विचार करत असतानाच अजित दादा आणि राजचे सामान गाडीवर चढलं...! दु:खी मनाने अजितदादा गाडीत बसले, तिकडे राज ही गाडीत बसला...! सामानाच्या गाड्या मागे होत्याच... पराभव खायला उठला होता... कुठे जायचे या विचारात दादांनी सेवकांना बारामती कडे धाडलं, राज ने ही सेवकांना मुंबईत धाडलं....! दोघे ही एकटेच गाडीत निघाले...! कुठं जायचे या विचारात दोघे ही रास्ता कापत राहिले....! 

किती तरी प्रहर भटकत राहिल्यावर दादांना अतिशय शांत आणि आध्यात्मिक अश्या अद्भुत शांततेनं भरलेला आश्रम दिसला...पराभवाचं भोचरे शल्य असताना अचानक त्यांना मनातलं वादळ काहीसं शांत झाल्याचे जाणवले..! ते त्या शांत परिसरात एका ठिकाणी डोळे मिटून बसून राहिले...! काही वेळाने दादांनी डोळे उघडले आणि बाजूला पाहिले तर बगतात काय, बाजूला राज ठाकरे बसलेले.. किती तरी वेळ दोघे शांत बसले...! त्यांचे डोळे बोलत होते... ! सर्वशक्तिमान सम्राटांच्या डोळ्यात पराभवाची अगतिकता दिसत होती. थोडा वेळ शांततेत गेल्यावर दादांनी शांतता भंग करत राजला विचारले इकडे कसा....! आणि संभाषण सुरु झाले.. !

दादा तू तर माझ्या पेक्षा मुरब्बी राजकारणी, पिंपरी चिंचवड नगरीचा तू कायापालट आणि तरी ही तुझा असा हा पराभव...? राजचा हा प्रश्न ऐकून दादांनी दीर्घ श्वास सोडला आणि सांगू लागले... अरे मोक्याच्या क्षणी माजे शिलेदार मला सोडून गेले.. तरी ही  कामाच्या जोरावर निवडून येईल वाटले..पण नगरीच्या लोकांनी कामाला मत नाही दिले कमळाला दिले.. तुझं काय झाले राज... अरे माझं ही तुझ्यासारखेच झालं... भरवशाची माणसे सोडून गेली आणि नाशिक नगरीने ही कामाला नाही कमळाला मत दिले. आता हा पराभव सहन होत नाही...सगळं सोडून द्यावे वाटतंय.. दादा ही म्हणाले अरे हो संन्यास घ्यायचा विचार येतोय डोक्यात....संन्यास घ्यायच्या विचारात दोघे ही थोडा वेळ शांत बसल्यावर त्यांना दूरवर आश्रमातला एक साधक बसलेला दिसला... काही कारण नसताना दोघे ही त्याच्याकडे गेले... दादा आणि राज काही बोलणार तेवढ्यात तो साधकच म्हणाला काय माझ्यासारखा संन्यास घ्यायचा विचार करताय.. दोघांनाही धक्का बसला... साधक बोलू लागला... अरे जय पराजय रणसंग्रामातला अविभाज्य घटक... सम्राट पद गेले म्हणून काय पण तुमचे पाठीराखे आहेत ना. तुम्हीचं हतबल झाला तर ते काय करणार. या पराभवाने तुमचे मावळे धाय मोकळून रडतायेत. सैरभैर झालेत...या वादळात त्यांनी तुमची साथ सोडली नाही.. आता तुम्ही त्यांना सोडून जायचा विचार करतात.... अरे राखेतुन किती तरी जणांनी भरारी मारली. तुम्हाला ही ते शक्य आहे. जे सोडून गेले ते स्वार्थी होते. जे राहिले ते निष्ठावान... त्यांच्या आधारावर पुन्हा साम्राज्य उभारा.... सल्ला देऊन साधक निघून गेला. अरे राज मी तर हा विचार केलाच नव्हता. राज ही म्हणाला अरे हो रे दादा ... दोघांनी एकमेकांकडे पहिले आणि फिनिक्स पक्षा प्रमाणे उभारी घ्यायचा विश्वास घेऊन ते आश्रमातून बाहेर पडले त्याच वेळी तिकडे पिंपरी चिंचवड आणि नाशिक मध्ये कमळाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरु असताना राजकारणाचे खऱ्या अर्थाने एक वर्तुळ पूर्ण झाले....!

नाशिक आणि पिंपरी चिंचवडच्या पराभवानंतर घडलेला हा काल्पनिक प्रसंग....!