पालघर पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावितांचा विजय
पालघर पोटनिवडणुकीचा निकाल हाती
पोलिसांचीच ही गत तर सर्वसामान्यांचं काय ? धक्कादायक प्रकार
सर्वसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस नागरिकांशी कसं वागतात, याचं उदाहरण समोर आलं आहे.
मीरा-भाईंदर निकाल, महायुती जिंकून दाखवणार?
मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. इव्हिएम मशीनद्वारे मतदान झाल्यानं पहिला निकाल मतमोजणीच्या काही वेळातच मिळण्याची शक्यता आहे.
चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना काँग्रेसचा दे धक्का!!
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकित काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसणार असे दिसते आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाहीये.
५ पालिकांसाठी मतदान सुरू, प्रतिसाद अत्यल्प
राज्यातल्या पाच महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भिवंडी, मालेगाव, लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदान होत आहे. मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्य़ा अत्यल्प असा प्रतिसाद दिसून आला.
पिंपरीमध्ये NCPच्या महापौर मोहिनी लांडे
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी मोहिनी लांडे यांचा विजय झाला आहे. मोहिनी लांडे यांनी शिवसेनेच्या शारदा बाबर यांचा पराभव केला आहे. मोहिनी लांडे यांना ९० मतं मिळाली आहेत तर शिवसेनेच्या शारदा बाबर यांना १५ मतं मिळाली.
मनसेमुळे फुलणार भाजपचं 'कमळ'
नागपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मनसे भाजपला मतदान करणार आहे. नागपूर महापालिकेत मनसेचे दोन नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेशिवाय भाजपने 'करून दाखवलं'
नागपूरात परस्पर विरोधी विचारधारा असलेले राजकीय पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. भाजपप्रणीत नागपूर विकास आघाडीमध्ये इंडियन मुस्लीम लीगनं प्रवेश केला आहे.
भास्कर जाधव यांचा निर्लज्जपणा - नीलेश राणे
नगरपालिका आणि त्यानंतर झेडपी निवडणुकीत राणे-जाधव वस्त्रहरण नाट्याचा आता निवडणूक निकालानंतरचा प्रयोग सुरू झाला आहे. सिंधुदुर्गच्या जनतेनं राष्ट्रवादीला स्वीकारलं मात्र रत्नागिरीतल्या जनतेनं बाहेरच्या लोकांना स्वीकारलं नाही असा टोला रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला आहे.
अकोल्यात त्रिशंकूने केला घोळ
७३ सदस्य असलेल्या अकोला महापालिकेत ३७ हा बहुमताचा जादूई आकडा पार करण्यासाठी भाजप-सेना युती आणि काँग्रेस आघाडीमध्ये जोरदार चुरस सुरू आहे.
मनसे उमेदवारानं केला कार्यकर्त्याचा खून
महापालिका निवडणुक संपून काही तास उलटत नाही तोवर नागपूरात राडा सुरू झाला. नागपुरात महापालिका निवडणुकीनंतर रक्तरंजीत राडा सुरु झाला आहे. मनसेच्या एका पराभूत उमेदवारानं एका मतदार कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना रेशीमबाग परिसरात घडली आहे.
शिवसेना शाखेत पराभूत मनसे उमेदवाराचा धिंगाणा
उल्हासनगरमधल्या वॉर्ड क्रमांक २५मध्ये शिवसेनेच्या नगरसेविरका वसुधा बोडरे विजयी झाल्य़ाने संतापलेल्या पराभूत मनसे आणि अपक्ष उमेदवारानं शिवसेना शाखेत घुसून तोडफोड केली.
शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांचा धुडगूस
यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या निवासस्थानी नाराज कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला.
पाहा लाईव्ह निकाल फक्त '24taas.com' वर
मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. www.24taas.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हांला लाईव्ह महानगरपालिका आणि जिल्हापरिषदचे निकाल पाहता येईल.
अकोला- अज्ञातांची मतदानकेंद्रावर दगडफेक
अकोल्यातल्या हरिहरपेठ भागातल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली.
सोलापुरात माजी महापौरांना अटक
सोलापुरचा माजी महापौर आणि प्रभाग क्रमांक ११ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटेंना अटक करण्यात आली आहे.
१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
रिकाम्या खुर्च्यांमुळे पवारांची सभा रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच शरद पवारांची सभा रद्द झाली आहे. पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी सांगता सभा होणार होती. तशी घोषणाही करण्यात आली.
तपास राष्ट्रवादीनं करावा, गृहखातंही आहे - माणिकराव
अमरावतीत जे पैसे सापडले ते कशासाठी होते, याचा तपास राष्ट्रवादीनं करावा, त्यांच्याकडे गृहखातंही आहे, असा टोला माणिकराव ठाकरेंनी लगावला आहे. राष्ट्रवादीनं याबाबत तक्रार करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईचं शांघाय आता नागपूरचं सिंगापूर?
अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुध्दा काँग्रेसला मुंबईचं शांघाय करता आलेलं नाही ते नागपूरचं सिंगापूर काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला विचारला आहे.