अजय देवगण साईबाबांच्या चरणी

आगामी ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या यशासाठी सिने अभिनेता अजय देवगण याने शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. या वेळी साईबाबांच्या समाधीवर ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाची ऑडीओ सी.डी. लावत त्याने साईंची मनोभावे पूजा केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 5, 2012, 04:31 PM IST

www.24taas.com, शिर्डी
आगामी ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या यशासाठी सिने अभिनेता अजय देवगण याने शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. या वेळी साईबाबांच्या समाधीवर ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाची ऑडीओ सी.डी. लावत त्याने साईंची मनोभावे पूजा केली.
शिर्डीला दर्शन घेतल्यावर अजय आपले वडील वीरु देवगण यांच्याबरोबर शनी- शिंगणापुरलाही गेला. तेथे जावून शनी मूर्तीचं दर्शन घेत अभिषेकही केला. शिर्डी आणि शिंगणापुर या दोन्ही ठिकाणी पोलीसांचे नियोजन चुकल्याने अत्यंत धक्काबुक्कीत अजय देवगणला मंदिरापर्यंत पोहचावे लागले. दोन्ही ठिकाणी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शिर्डी तर या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
साईमंदिरातून दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी अजय देवगणचा शाल आणि श्रीफळ देवून सत्कार केला. प्रचंड गर्दी रेटा रेटी चाहत्यांचा जल्लोष आणि साई दर्शनाने भारावून गेलेल्या अजयने स्कॉर्पिओवर चढून आपल्या चाहत्यांना अभिवादन केले.