'बलात्कारासाठी बॉलिवूडला जबाबदार नका ठरवू'

बॉलिवूडमधील हिंदी सिनेमा आणि द्विअर्थी गाणी, संवाद किंवा अश्लील दृष्य यामुळे समाजात घडणाऱ्या दुष्कर्मांना चालना मिळत आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.

Updated: Dec 25, 2012, 09:37 AM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडमधील हिंदी सिनेमा आणि द्विअर्थी गाणी, संवाद किंवा अश्लील दृष्य यामुळे समाजात घडणाऱ्या दुष्कर्मांना चालना मिळत आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र चित्रपट व्यवसायातील अधिक दिग्दर्शकांना मात्र तस वाटत नाही. डर्टी पिक्चरचे दिग्दर्शन मिलन लुथरियाच्या मते, बलात्कार आणि त्यासंबंधित अपराधासाठी सिनेमांना दोषी ठरवणं योग्य नाही.
लुथरियाने म्हटंल की, माझ्या मते, असा आरोप लावणं योग्य नाहीये. आपण आपला समाज आणि संस्कृती जीवनशैली काय आहे ते पाहणं महत्त्वाचे आहे. आपल्याला वास्तविक मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. `शिरीन फरहान की तो निकल पडी` या सिनेमा दिग्दर्शिका बेला सहगलचं म्हणणं आहे की, मुलांमघ्ये लहान वयापासूनच महिलांविषयी सम्मान निर्माण केला गेला पाहिजे. एक पुरूष दुसऱ्या महिलेसोबत अस कृत्य करूच कसं शकतो. जेव्हा की, एक महिलाच त्या पुरूषाला जन्म देते. सहगलचं म्हणणं आहे की, सिनेमा हे समाजचं प्रतिबिंब असतं, आणि त्याला दोषी ठरवणं योग्य नाही. सिनेमा आपल्या समाजाचा आरसा आहे. मात्र मी इतके बिभित्स कृत्य कोणत्याच सिनेमात पाहिलेले नाही.

निश्चितच सिनेमातील हिंसक घटनांचा लोकांवर परिणाम होत असतो. मात्र २३ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारे हे मानसिकदृष्ट्या वासनेने बरबटलेले होते. त्यामुळे ह्या घटना घडतात. सिनेमात नेहमीच दाखवलं जातं की, बलात्कारानंतर महिलांना काय भोगावं लागतं, तर मात्र दोषी पुरूषांना काय शिक्षा केली जाते याबाबत जास्त काही दाखवलं जात नाही. आणि त्यामुळेच पुरूषांच्या मनात भय निर्माण होत नाही.