आपल्या मुलाचं नाव सलमान, शाहरुख ठेवू नका

ईदचं औचित्य साधून रिलीज झालेल्या शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं पहिल्याच दिवशी चांगला गल्ला कमावला. मात्र शाहरुख आणि सलमान ही नावं आपल्या मुलांची ठेवायची नाही, असा फतवा ईदचं औचित्य साधून उत्तरप्रदेशमध्ये काढण्यात आलाय.

Updated: Aug 11, 2013, 05:31 PM IST

www.24taas.com झी, मीडिया, मेरठ
ईदचं औचित्य साधून रिलीज झालेल्या शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं पहिल्याच दिवशी चांगला गल्ला कमावला. मात्र शाहरुख आणि सलमान ही नावं आपल्या मुलांची ठेवायची नाही, असा फतवा ईदचं औचित्य साधून उत्तरप्रदेशमध्ये काढण्यात आलाय.
उत्तरप्रदेशाच्या मेरठ गावातील एका मौलवीनं हा फतवा काढलाय. दरवर्षी ईदला शाहरुख किंवा सलमानचा एखादा नवीन सिनेमा रिलीज होतो आणि त्यांना गल्ला कमवून देतो. ईद हे खान यांच्या कमाईसाठी एक चांगलं निमित्त झालंय. हे बॉलिवूड स्टार आपला फायदा होण्यासाठी ईदच्या सण असतांनाच आपले चित्रपट रिलीज करतात आणि जास्त कमाई करतात. मात्र यात ते फक्त स्वतःचाच फायदा पाहतात. मुस्लिम समाजासाठी काहीही करत नाही, असं मौलवीचं म्हणणं आहे. त्यामुळं आपल्या मुलांचं नाव शाहरुख, सलमान ठेवू नये असा फतवाच या मौलवींनी काढलाय.
यंदा ईदच्या निमित्तानं रिलीज झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ देखील हीट ठरलाय. ईदच्या निमित्तानं चित्रपट रिलीज करण्याची क्रेझ खान स्टार्समध्ये जास्त आहे.

याआधी ईदचं औचित्य साधून वीर-झारा, वॉन्टेड, बॉडीगार्ड यासारखे अनेक चित्रपट हीट ठरले आहेत आणि यावर्षी ईदच्या वेळेस शाहरुख खानची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ प्रेक्षकांच्या भेटीला आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.