हृतिक रोशनची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी

अभिनेता हृतिक रोशनवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ब्रेन सर्जरी करण्यात आलीय. ही सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्याचं हृतिकवर सर्जरी करणारे डॉक्टर बि. के. मिश्रा यांनी सांगितलंय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 7, 2013, 10:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता हृतिक रोशनवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ब्रेन सर्जरी करण्यात आलीय. ही सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्याचं हृतिकवर सर्जरी करणारे डॉक्टर बि. के. मिश्रा यांनी सांगितलंय..
हृतिकची तब्बेत आता बरी असून 2 ते 3 दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. मात्र, अजून किमान 2 ते 3 आठवडे हृतिकला आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.. त्यानंतर पूर्वीप्रमाणेच हृतिक शुटिंग करु शकतो असंही डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं..
फुकेट येथे शुटिंग दरम्यान स्टंट्स करत असताना हृतिकच्या डोक्याला जखम झाली.. त्यानंतर त्याचं डोकं दुखू लागलं.. दरम्यान, शुटिंग संपवून भारतात परतल्यानंतरही डोकंदुखी सुरुच होती.. आणि म्हणूनच एमआरआय करण्यात आला.. आणि त्याच दरम्यान त्याच्या मेंदूत गाठ असल्याचं आढळून आलं.. आणि त्यामुळेच ही सर्जरी करावी लागलीय..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.