www.24taas.com, मुंबई
मला भारतीय असल्याचा गर्व असल्याचं शाहरुख खान याने ठणकावून सांगितलं आहे. मी असुरक्षित वाटत असल्याचं मी कधीच म्हटलं नाही. आधी माझे लेख वाचा, मग बोला असा सल्ला शाहरुख खानने दिला आहे.
एका पुरस्कार सोहळ्यात शाहरुख सामील झाला होता. त्यावेळी त्याने सुमारे १० मिनिटे लिखित स्वरुपात त्याने आपले भाषण दिले. यावेळी त्यांने त्याच्याबद्दल निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले.
मला प्रत्येक जाती, धर्माच्य़ा लोकांकडून मला प्रेम मिळालं. माझे संपूर्ण कुटुंब एक मिनी इंडिया आहे. छोट्या छोट्या फायद्यांसाठी लोक माझा वापर करीत आहे. मी पहिले भारतीय असून मग एक व्यक्ती आहे. भारतातल्या लोकांनी गेली २० वर्षं मला प्रचंड प्रेम दिलं आहे. मी माझ्या मुलांना मानवता शिकवतो. मला भारतीय आणि खान होण्याचा अभिमान आहे.
मी कुठेही म्हटले नव्हते की मला भीती वाटते आहे. जे माझ्याबद्दल बोलत आहेत त्यांनी सुरूवातील लेख वाचावा आणि मग बोलावे. मी माझ्या देशात सुरक्षित आहे. मी कधीही असुरक्षित असल्याचे म्हटले नाही, माझ्या लेखाचा विपर्यास करून मांडला जात आहे.
मी सध्या जे करीत आहे. त्यात मी खूश आहे. अभिनयामुळे मला लोकांनी भरपूर प्रेम दिले. तू हिंदू बने गा ना मुस्लमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा... मी माझ्या मुलांना मानवता हा धर्म शिकवतो, त्यामुळे छोट्या छोट्या फायद्यासाठी काही लोक माझ्या नावाचा वापर करीत असल्याचे मला वाटत असल्याचे शाहरुख यावेळी उद्विग्न होऊन बोलला.