गुड न्यूज: होय जेनेलिया प्रेग्नेंट आहे- रितेश देशमुख

नुकतीच देशमुख कुटुंबात एक नव्या पाहुण्याचं आगमन झालंय आणि पुन्हा एकदा आणखी एका पाहुण्याच्या आगमनासाठी देशमुख कुटुंब सज्ज झालंय. होय विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख बाबा होणार आहेय रितेश आणि जेनेलियाच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. खुद्द रितेश देशमुखनेच त्याबाबतची माहिती दिली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 8, 2014, 08:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नुकतीच देशमुख कुटुंबात एक नव्या पाहुण्याचं आगमन झालंय आणि पुन्हा एकदा आणखी एका पाहुण्याच्या आगमनासाठी देशमुख कुटुंब सज्ज झालंय. होय विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख बाबा होणार आहेय रितेश आणि जेनेलियाच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. खुद्द रितेश देशमुखनेच त्याबाबतची माहिती दिली आहे.
सध्या अभिनेता रितेश देशमुखच्या घरी आनंदाची बातमी आहे. पत्नी जेनेलिया डिसूजा- देशमुख प्रेग्नंट असल्याचं रितेश देशमुखनं सांगितलं आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रितेशनं ही खुशखबर दिली आहे.
जेनेलिया प्रेग्नंट असल्याच्या बातम्या यापूर्वीच मीडियातून येत होत्या. मात्र त्याला देशमुख कुटुंबियांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. पण आता यावर रितेशनंच शिक्कामोर्तब केलं आहे. “जेनेलिया प्रेग्नंट आहे. आम्ही चिमुकल्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत असून, त्याबाबत आम्ही खूपच उत्सुक आहे” असं रितेश म्हणाला.
जेनेलिया नेहमीच आयफाला हजेरी लावते मात्र यंदाच्या आयफा अॅवॉर्ड्स सोहळ्यात रितेशसोबत जेनेलिया दिसली नव्हती. तेव्हच जेनेलियाच्या प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. नुकतंच रितेशच्या भावाला मुलगा झालाय. ही बातमी रितेशनंच ट्विटरवरून दिली होती. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या वाढदिवशीच त्यांच्या नातवानं जन्म घेतलाय. आता रितेश-जेनेलियाकडे गोड बातमी आहे.
रितेश आणि जेनेलियाच्या या गोड प्रवासासाठी आमच्याही शुभेच्छा!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.