नव्या नात्यासाठी `इश्कजादीं` तयार!

इश्कजादी परिणीती चोपडा सध्या नव्या नात्यांमध्ये अडकण्यासाठी तयार आहे... तशी कबुली खुद्द परिणीतीनंच दिलीय. याचबरोबर सध्या आपण कुणासोबतही नात्यात नाही, हे सांगायला ती विसरलेली नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 8, 2014, 06:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इश्कजादी परिणीती चोपडा सध्या नव्या नात्यांमध्ये अडकण्यासाठी तयार आहे... तशी कबुली खुद्द परिणीतीनंच दिलीय. याचबरोबर सध्या आपण कुणासोबतही नात्यात नाही, हे सांगायला ती विसरलेली नाही.
`कॉफी विथ करण` या कार्यक्रमाच्या अंतिम भागासाठी नुकतीच परिणीती चोप्रा हजर होती. यावेळी, आपल्या प्रेमात कुणीतरी पडावं, आपल्या आयुष्यात जवळची व्यक्ती असावी, अशा भावना आपल्याही मनात निर्माण झाल्याची कबुली परिणीतीनं दिलीय.
`लेडीज वर्सेस रिकी बहल` आणि `शुध्द देसी रोमान्स` चित्रपटाचा दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्यातील छुप्या प्रेमाबद्दल जेव्हा करणनं तिला विचारलं तेव्हा परिणीतीनं याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. `मला मनिषबद्दल आदर आहे... पण, त्याच्या आणि माझ्यात रोमान्स नाही... आमच्या दोघांत असं काही असूच शकत नाही` असंदेखील परिणीतीनं म्हटलंय.
`दावत-ए-इश्क` या आगामी चित्रपटात ती आदित्य रॉय कपूरबरोबर दिसणार आहे. २०११ सालच्या यशराज फिल्म्सच्या `लेडीज वर्सेस रिकी बहल` या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या परिणितीनं २०१३ सालच्या `इश्कजादें` या चित्रपटातील भूमिकेसाठी `राष्ट्रीय पुरस्कार` प्राप्त केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.