www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सातत्याने या ना त्या कारणाने प्रसिद्धी झोतात राहणारी हॉट मॉडेल पूनम पांडेने एका कन्नड चित्रपटात आयटम साँग करण्यासाठी पाच कोटी रुपये घेतले. त्यामुळे तिची चलती असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
`नशा` या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारी पूनम आता दक्षिण भारतीय चित्रपटात काम करणार आहे. `नशा` चित्रपटातील पूनमचा अभिनय पाहून तिला आयटम साँगसाठी करारबद्ध करण्यात आले आहे. कन्नडमधील आगामी चित्रपटातील आयटम साँगसाठी पूनमकडे निर्मात्याने विचारणा केली होती.
या सिनेमात मी सर्वाधिक जास्त पैसे एका आयटम साँगसाठी घेतले आहेत, असे पूनम म्हणाली. पूनमने आपल्या चित्रपटात काम करावे यासाठी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अन्य चित्रपटकर्ते देखील तिच्याशी संपर्कात असल्याची चर्चा आहे.
`नशा`हा तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर, पूनमने चाहत्यांच्या चर्चेत राहण्यासाठी ट्विटरवर अर्धनग्न फोटो प्रसिध्द करणे आणि धक्कादायक विधाने करून पूनम सातत्याने चर्चेत राहिली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.