www.24taas.com, चेन्नई
सुपरस्टार रजनीकांतवरच उपोषण करण्याची वेळ आली आहे. मात्र, हे उपोषण त्यांने लावण्यात येणाऱ्या कराच्याविरोधात सुरू केलंय.
दक्षिणेतला तमिळ सुपरस्टार अशी रजनीकांतची ओळख आहे. चित्रपट क्षेत्रातील कलाकार, निर्माता आणि दिग्दर्शक यांना करापोटी जादाची रक्कम मोजावी लागणार आहे. हा कर अन्यायकारक आहे. तो रद्द करण्याची मागणी रजनीकांत यांने करत अधिक कराच्या विरोधात हे उपोषण सुरू केलंय.
चेन्नईत सोमवारी हे उपोषण सुरू केलंय. रजनीकांतला तमिळ चित्रपट क्षेत्रातील निर्मात्यांही मोठा पाठिंबा देताना उपोषणात सभाग घेतला आहे. रजनीकांतला पाठिंबा देण्यासाठी तमिळ चित्रपटसृष्टीत सर्व चित्रपटांचं शुटिंग बंद ठेवण्यात आलं. तर फिल्म थियटर्समधील संध्याकाळपर्यंतचे शो ही रद्द केलेत.
मनोरंजन क्षेत्रातील निर्माते, वितरक यांच्यासाठी वर्षभरापूर्वी सेवाकरात सूट देण्यात आली होती. कलाकार, दि्ग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शकांनाही यातून वगळण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. कलाकार, दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शकांना १२.३६ टक्के सेस लावण्यात आला आहे.