दबंग’ खान होणार दिग्दर्शक!

बॉलिवूडचा दबंग खान आता एका वेगळ्याच विषयामुळं चर्चेत आला आहे. बॉलिवूडमधील अॅक्टिंगची २५ वर्ष पूर्ण करणारा सलमान आता चित्रपट दिग्दर्शक होणार आहे.

Updated: Sep 5, 2013, 01:39 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा दबंग खान आता एका वेगळ्याच विषयामुळं चर्चेत आला आहे. बॉलिवूडमधील अॅक्टिंगची २५ वर्ष पूर्ण करणारा सलमान आता चित्रपट दिग्दर्शक होणार आहे.
अॅक्टिंगनंतर सलमान आता दिग्दर्शक होणार आहे. सलमानचे दोन्ही भाऊ दिग्दर्शन क्षेत्रात आहेत. आता सलमान देखील या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान हे आधीपासूनच या क्षेत्रात व्यस्त आहेत.
सलमानची ‘बिईंग ह्यूमन’ ही चेरिटेबल संस्था खूप मोठी आणि यशस्वी आहे. ‘ही संस्था सुरूवातीपासूनच कपडे, घड्याळ यासारख्या अनेक वस्तूची विक्री करते. पण या संस्थेला आणखी यश मिळवून देण्यासाठी सलमान आता प्रयत्न करतोय.
सलमान सुरूवातीला पाच चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. सलमाननं याआधी अनेकांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळवून दिली आहे. सलमाननं चित्रपटासाठी अनेक दिग्दर्शकांशीही चर्चा केल्याचं कळतंय. त्यात सूरज पांचोली आणि आथिया शेट्टी यांचाही समावेश आहे. तो ‘हिरो’ चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची माहिती सलमानच्या मित्रांकडून मिळतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.