टॉलिवूडच्या `हॅट्रीक हिरो`नं केली आत्महत्या

तेलगु सिनेमांतील अभिनेता उदय किरण यानं आत्महत्येनं टॉलिवूडला चांगलाच धक्का बसलाय. हैदराबादमधल्या श्रीनगर कॉलनीतील आपल्या राहत्या घरात रविवारी रात्री उद्य किरणनं आत्महत्या केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 6, 2014, 11:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
तेलगु सिनेमांतील अभिनेता उदय किरण यानं आत्महत्येनं टॉलिवूडला चांगलाच धक्का बसलाय. हैदराबादमधल्या श्रीनगर कॉलनीतील आपल्या राहत्या घरात रविवारी रात्री उद्य किरणनं आत्महत्या केलीय.
उदयनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समजताच त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान उदय किरण यानं आत्महत्या का केली याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
उदय किरण याला तेलगु सिनेमांचा ‘हॅट्रीक हिरो’ म्हणून ओळखळा जात होता. त्याच्या लागोपाठ तीन सिनेमांनी यशाचं कळस गाठलं होतं. उदयला फिल्म फेअर अवॉर्डही मिळालं होतं. अवघ्या ३४ वर्षांच्या उदय किरणनं दोन डझनहून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. नुकतेच, उदयचे सात चित्रपट दणादण आदळले होते. ऑक्टोबर २०१२ मध्ये उद्य विशिथा हिच्यासोबत विवाहबद्ध झाला होता.

चित्रम, नूव्वू नेनू, मानसंस्था नूव्वे आणि नी स्नेहम अशा अनेक सिनेमांमध्ये उदय दिसला होता. ‘जय श्रीराम’ हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.