www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल फिक्सिंगमध्ये आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. आयपीएलच्या सहाव्या सत्रात मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुलीसोबत पकडला गेला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुकीज आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना मुलीही पुरवित होत्या. सुत्रांच्या माहितीनुसार बुकीनीच श्रीसंतला मुंबईच्या हॉटेलमध्ये मुलगी दिली होती. या प्रकरणात अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया हे देखील अडकण्याची शक्यता आहे.
आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंगने आयपीएलची काळी बाजू उघड झाली. श्रीसंत आणि इतर दोन खेळाडूंनी लाखो रूपयांसाठी स्पॉट फिक्सिंग केल्याचे उघड झाले. पण त्यानंतर आणखी एक खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगनंतर आता सेक्स स्कॅण्डल उघड झालं आहे.
बुकी खेळाडूंना मुली पुरवत असल्याचे समोर आले आहे. IPL फिक्सिंग प्रकरणात नवा खुलासा करण्यात आला. श्रीसंत एका मुलीसोबत पकडला गेला होता? असाही एक खुलासा करण्यात आला. IPLमध्ये `पैसा आणि सेक्स`चा धुमाकूळ असल्याचे उघड झाले आहे. IPL फिक्सिंग प्रकरणी खळबळजनक खुलासा म्हणजे बुकी इतरही खेळाडूंना मुली पुरवित होते. त्यात अंकित चव्हाण आणि अजित चंदेलियादेखील संशयाच्या भोव-यात असल्याचे समजते आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.