www.24taas.com, झी मीडिया, दुबई
आयपीएलच्या सातव्या सत्रासाठीच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री येत्या गुरुवारपासून सुरु होतेय. भारतात लोकसभा निवडणुका आणि आईपीएल मॅचेस एकाच वेळेस आल्यानं टूर्नामेंटच्या पहिल्या सत्रातील मॅच संयुक्त अरब आमिरातमध्ये (यूएई) आयोजित करण्यात आल्यात.
थेट मैदानावर जाऊन आयपीएल मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षक www.iplt20.com (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.आईपीएलटी20.कॉम) आणि www.ticketmaster.ae (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.टिकटमास्टर.एई) वर तिकीट उपलब्ध होतील.
याशिवाय, ६ एप्रिलपासून अबुधाबी, दुबई आणि शारजाहच्या लुलु हायपरमार्केटसच्या काही ठराविक स्टोअर्समध्ये तिकीट उपलब्ध होतील तर १० एप्रिलपासून स्टेडियमच्या बॉक्स ऑफिसवरही प्रेक्षक तिकीट प्राप्त करू शकतील.
अबुधाबीच्या मॅचसाठी तिकीटांची किंमत एका मॅचसाठी २० दिरहम (यूएई) आणि दो मॅचसाठी ३० दिरहम असेल.
दुबईमध्ये एका मॅचसाठी ३० दिरहम आणि एकाच दिवसातील दोन मॅचसाठी ५० दिरहम असा तिकीटांचा दर असेल.
शाहरजाहमध्ये तिकटांची किंमत एका मॅचसाठी ३० दिरहम आणि दोन मॅचसाठी ४० दिरहम अशी निर्धारीत करण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.