www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
भारतीय टीम डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौ-यावर जाणार आहे. लंडनमध्ये भारतीय क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत या दौ-यामध्ये तीन वन-डे आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे. दरम्यान, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं हरून लॉरगट यांची उचलबांगडी केली आहे. लॉरगट यांच्यामुळेच आफ्रिका दौ-यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. अखेर त्यांची हकालपट्टी करण्यात आल्यानं भारतानं या दौ-यासाठी हिरवा कंदील दिला आहे.
द. आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी लवकरच या दौऱ्याचा कार्यक्रम आखणार असल्याचे, सांगण्यात आले आहे. बीसीसीआयशी खराब संबंध असलेले हरून लॉर्गट यांना पदावरून निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाकडून बीसीसीआयला देण्यात दिलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.