www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल टी २० टुर्नामेंटमधील ६० ते ७० टक्के सामने भारतात होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर, आयपीएएलचे चेअरमन रंजीब बिस्वाल यांनी ही माहिती दिली आहे.
आयपीएलचे जास्तच जास्त सामने भारतात घेण्यावर बीसीसीआयच्या बैठकीत एकमत झालं आहे. या बैठकीला बोर्डाचे अध्यक्ष एन श्रीनिवासन, सिनियर उपाध्यक्ष राजीव शुल्का, सचिव संजय पटेल, बिस्वाल आणि आयपीएलचे सीईओ सुंदर रमन उपस्थित होते.
इंडियन प्रिमियर लीग असं टुर्नांमेंटचं नाव असल्याने जास्तच जास्त सामने भारतात खेळवण्यावर जोर दिला जाणार आहे. परदेशात खेळाचं आयोजन करण्यावर अजून काहीही ठरलेलं नाही, परदेशात सामन्यांचं नियोजन करण्यासाठी आम्हाला आणखी वेळ हवा आहे.
निवडणूक आयोगाने बुधवारी सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. यात सात एप्रिल ते १२ मे दरम्यान मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणीची तारीख जाहीर करण्यात आली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.