आयपीएल :... तर मॅच न खेळताच पंजाब फायनलमध्ये!

गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे आज ईडन गार्डनवर यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होणाऱ्या आयपीएल-7 च्या पहिल्या क्लालीफायरला स्थगिती देण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 27, 2014, 10:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे आज ईडन गार्डनवर यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होणाऱ्या आयपीएल-7 च्या पहिल्या क्लालीफायरला स्थगिती देण्यात आलीय.
ही मॅच उद्या याच मैदानावर सायंकाळा चार वाजता खेळण्यात येईल. निसर्गानं साथ दिली तर जास्तीत जास्त रात्री नऊ वाजून 10 मिनिटांपर्यंत पाच ओव्हरची मॅच खेळली जाऊ शकते.
आज सायंकाळी पाच वाजून 15 मिनिटांनी मैदानातील अंपायरांनी खेळपट्टीचं निरिक्षण केलं. त्यानंतर त्यांनी सर्वसंमत्तीनं मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या नियमांनुसार पाच ओव्हरचीही मॅच खेळणं अशक्य होतं. हीच परिस्थिती कायम राहिल्यास मॅचचा निर्णय सुपर ओव्हरनं केला जाईल.
सुपर ओव्हरही शक्य झाली नाही तर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमला लीगमध्ये जास्त मॅच जिंकल्याच्या कारणानं फायनलमध्ये जागा मिळेल... पंजाबनं लीगमध्ये 11 तर कोलकाता नाईट रायडर्सनं 9 मॅच जिंकल्यात.
अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सला फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. 30 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये होणाऱ्या मॅचच्या विजेत्यासोबत `एलिमिनेटर` मॅच खेळायची संधी कोलकाताला मिळेल.
आयपीएलनुसार ज्या दर्शकांनी आजच्या मॅचचे तिकिटं विकत घेतली आहेत ते प्रेक्षक ही तिकिटं उद्याच्या मॅचसाठी वापरू शकतात. यासाठी, बारकोडला कोणतीही हानी टाळणं गरजेचं आहे. स्टेडियमचे गेट उद्या दुपारी दोन वाजल्यापासून खुले होतील.
मॅचच्या मूळ दिवशी आणि आरक्षित दिवशीही एकही बॉल फेकला गेला नाही, तर प्रक्षेकांचे तिकिटांचे पैसे परत केले जातील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.