www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी काही राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचा समावेश असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला असल्याची वृत्त आहे. राजस्थान रॉयल्सकडून यापूर्वीच्या सीजनमध्ये खेळलेला आणि आता बुकी झालेला अमित सिंग याची चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या चौकशीत त्याने दोन आघाडीच्या फलंदाजांचे नाव घेतले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिस या दोन फलंदाजांवर लक्ष ठेऊन आहे.
द्रविड, शिल्पा आणि राज कुंद्राची चौकशी?
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राहुल द्रविडचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. तसंच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मुंबईत दोन बुकींना अटक
मुंबईतून आणखी दोन बुकींना अटक करण्यात आलीय. प्रवीण बेहरला याला भांडुपमधून अटक तर नीरज शहा याला काळाचौकीतून अटक करण्यात आलीय.
खेळाडू टीमचे सिक्रेट सट्टेबाजांकडे करायचे लीक!
राजस्थान रॉयल्सचे तिन्ही खेळाडू फक्त आपल्या कामासाठी सट्टेबाजांकडून पैसे घेत नव्हते, तर टीम मीटिंगमध्ये होणारी गुप्त चर्चाही सट्टेबाजांना सांगायचे.
सामन्याच्या एक दिवसअगोदर टीम मीटिंग व्हायची, त्या वेळी यात सर्व खेळाडूंची भूमिका निश्चित होत असे. सामन्यानुसार पहिले षटक कोण टाकणार आहे आणि कोण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे हेसुद्धा टीम मीटिंगमध्ये ठरायचे. ही सर्व माहिती सट्टेबाजांपर्यंत पोहोचायची.
या सत्रात रॉयल्सकडून बर्याणच वेळा अजित चंदेलियाने गोलंदाजीची सुरुवात केली होती.
स्टेडिअममध्ये होता बुकी
पाच मे रोजी पुणे आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होता. त्या वेळी बहुदा बुकी स्टेडियममध्ये उपस्थित होता. आयपीएलची तयारी करीत असलेल्या राजस्थान क्रिकेट संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकार्या ने सांगितले की, साधारणपणे बीसीसीआयच्या अँटिकरप्शन युनिटचे (एसीयू) अधिकारी साऊथ पॅव्हेलियनमध्ये खेळाडूंच्या जवळपास फिरत असतात. मात्र, त्यादिवशी एक अधिकारी अचानक पॅव्हेलियनच्या विरुद्ध स्थित असलेल्या नॉर्थ स्टॅडकडे गेला आणि विशेष भागाची पाहणी केली.
त्या वेळी त्या अधिकार्याहने काही फोटोसुद्धा खेचले. नंतर तो ब्रॉडकॉस्टर रूममध्ये सुद्धा गेला आणि स्टॅँडचे काही रिप्ले बघितले. यापूर्वी एसीयूचा अधिकारी नॉर्थच्या दिशेने कधीही दिसला नव्हता, असेही आरसीएच्या अधिकार्याँने सांगितले.
अंकित चव्हाणने दिली फिक्सिंगची कबुली – सूत्र
आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे कोडं आता हळूहळू उलगडू लागलं आहे. IPL फिक्सिंग प्रकरणात अंकित चव्हाण याने फिक्सिंगची कबुली दिली असल्याचे सुत्रांकडून समजते. IPL फिक्सिंग प्रकरण अंकित चव्हाण सह अजित चंदेलिया याने देखील कबुली दिली आहे. त्यामुळे फिक्सिंग प्रकरणात काय घडलं हे लवकरच समोर येईल.
मागील वर्षीही झाले फिक्सिंग
आयपीएलच्या फिक्सिंग प्रकरणात अटक केलेल्या तीनही खेळाडूंची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. त्यांच्यात काय बोलणं झालं याची देखील चौकशी करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अजित चंदेलिया याने आयपीएलच्या मागील वर्षाच्या सीजनमध्येही फिक्सिंग केल्याचे कबूल केले
बुकीज पुरवित होते मुली, श्रीसंतला मुलीसोबत अटक
आयपीएल फिक्सिंगमध्ये आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. आयपीएलच्या सहाव्या सत्रात मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुलीसोबत पकडला गेला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुकीज आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना मुलीही पुरवित होत्या. सुत्रांच्या माहितीनुसार बुकीनीच श्रीसंतला मुंबईच्या हॉटेलमध्ये मुलगी दिली होती. या प्रकरणात अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया हे देखील अडकण्याची शक्यता आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.