www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
निवृत्तीनंतर मैदानाबाहेरच दिसलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा मैदानात पाहता येणार आहे... पण, यावेळी तो स्वत: खेळताना नाही तर तरुण क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे देताना दिसणार आहे.
भारताचे स्टार युवा क्रिकेटपटू उन्मुक्त चंद, परवेज रसूल, विजय झोल, मनन वोहरा, मनप्रीत जुनेजा, रस कलारिया, चिराग खुराना, आकाशदीप नाथ, विकास मिश्रा, सरफराज खान आणि बाबा अपाराजित या खेळाडूंना क्रिकेटचे धडे देणार आहे.
`युवा खेळाडूंसाठी कंपनीने उचलेले पाऊल कौतुकास्पद आहे. या प्रतिभावंत खेळाडूंच्या रूपाने मला पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये योगदान देता येईल याचा विशेष आनंद आहे` अशा शब्दांत सचिननं आपल्या नव्या इनिंगविषयी आपली भावना व्यक्त केलीय.
देशातील ११ उदयोन्मुख खेळाडूंच्या मार्गदर्शकाच्या रुपाने का होईना पण सचिनच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा मैदानात पाहता येईल, हे नक्की.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.