www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेटचा तारा सचिन तेंडुलकर याला चार फेब्रुवारीला देशातील सर्वात मोठा सन्मान असलेल्या भारत रत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३ फेब्रवारी रोजी या समारंभाची रंगीत तालीम होणार असून ४ फेब्रवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात येणार आहे.
सचिन तेंडुलकरसह देशातील सर्वोच्च नागरिक सन्मानाने शास्त्रज्ञ सीएनआर राव यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरला भारत रत्न देण्याची घोषणा राष्ट्रपती भवनातून करण्यात आली होती. सचिन हा पहिला भारतीय खेळाडू आहे की ज्याला भारत रत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे.
दरम्यान, सचिनला भारत रत्न देण्यावरून खूप वाद निर्माण झाला होता. काही संघटनांच्या मते मेजर ध्यानचंद यांना सचिन पूर्वी सन्मानित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी २००९ मध्ये शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक दिवंगत भीमसेन जोशी यांना भारत रत्नाने सन्मानित करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.