www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलकत्ता
कोलकाता टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरला चुकीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. शेन शिलिंगफोर्डच्या बॉलिंगवर अंपायर निगेल लाँगनं त्याला चुकीच्या पद्धतीनं आऊट दिलं. या निर्णयावर सचिनही नाराज झालेला दिसला.
पॅव्हेलियनमध्ये परतल्यानं त्यानं आपली नाराजी स्पष्ट दर्शवली. अंपायरच्या या वादग्रस्त निर्णयावर चाहतेही चांगलेच नाराज झाले. सचिनची मास्टर इनिंग बघायला आलेल्या चाहत्यांची यामुळे निराशा झाली. सचिनला १०रन्सवर आऊट देण्यात आलं. कॉमेंटेटर्सनही सचिनच्या या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उभ केलं आहे.
दरम्यान, कोलकाता टेस्टमध्ये टीम इडंयाची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारताचे रशी-महाराथी शेन शिलिंगफोर्डच्या स्पिन बॉलिंगसमोर तग धरु शकले नाही. शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच काहीच कमाल करू शकले नाही.
धोनीनं रोहितबरोबर भारताची इनिंग सावरण्य़ाचा प्रयत्न केला. मात्र, धोनी ४२ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रोहित शर्मा आणि आर. अश्विननं भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही. आणि विंडीज बॉलर्सना आपलं वर्चस्व गाजवून दिलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ