www.24taas.com, कोलंबो
श्रीलंकेत 18 तारीख आजपासून टी-20चा महासंग्राम सुरु होतोय..12 टीम्स 20 दिवस वर्ल्ड विजेतेपद पटकावण्यासाठी झुंजणार...या सर्व 12 टीम्सला 4 ग्रुपमध्ये ठेवण्यात आले असून प्रत्येक ग्रुपमधील टॉपच्या दोन टीमचं सुपर एटमध्ये दाखल होणार आहे. टी-ट्वेन्टिचा महासंग्राम श्रीलंकेत सुरु होतोय..
क्रिकेटच्या या झटपट फॉरमॅटमध्ये अजिंक्यपद पटकावण्यासाठी 20 दिवस मातब्बर टीम्समध्ये मुकाबला रंगणार..वर्ल्ड कपमध्ये माजी विजेत्या भारत, पाकिस्तान आणि इंग्लंडसह एकूण बारा टीम्स चार ग्रुपमध्ये आमने-सामने येणार.ग्रुप ए मध्ये पहिल्या टी-20 वर्ल्ड कपवर कब्जा करणा-या भारतीय टीमचा समावेश आहे....भारतासमोर ग्रुप ए मध्ये प्रमुख आव्हान असणार ते गतविजेत्या इंग्लंडचं तर ग्रुप ए मधील तिसरी टीम अफगाणिस्तानची आहे... ग्रुप बीमध्ये पहिलं टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आतूर असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमसह विजेतेपदाची प्रबळ दावेदार वेस्ट इंडिज टीम आहे.
या ग्रुपमध्ये तिसरी टीम आहे ती धोकादायक आयर्लंडची... ग्रुप सीमध्ये घरच्या मैदानावर खेळणा-या लंकन टीमसह दक्षिण आफ्रिकेची टीम आपला दम दाखवण्यास आतूर असणार. झिम्बाव्बेची टीमही ग्रुप सीमध्ये धक्कादायक निकालाची नोदं करण्यासाठी सज्ज असणार...वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ऑफ डेथ म्हणून ग्रुप डीकडे पाहण्यात येतंय...माजी विजेता पाकिस्तान डॉर्क हॉर्स न्यूझीलंड आणि धोकादायक बांग्लादेश या ग्रुपमध्ये आहेत... प्रत्येक ग्रुपमधील टॉप टू टीम्स सुपर एटमध्ये दाखल होतील. त्यानंतर ख-या अर्थानं टी-20 लढतींचा थरार अनुभवता येईल..
मात्र ग्रुप स्टेजमध्येही मातब्बर टीम्सला अफगाणिस्तान आणि आयरिश टीमपासून सावध रहावं लागणार. टी-20 फॉरर्म्याटमध्ये धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता या दोन्ही टीम्समध्ये निश्चितच आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक मॅच चुरशीची होणार यात शंका नाही...