www.24taas.com, वेलिंग्टन
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर यांच्या मारहाण प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरूवातीला या प्रकरणात २० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात होती. त्यानंतर एका ३७ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना ख्राइस्टचर्च कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला बुधवारी रात्री ख्राईस्टचर्चमधील एका बार बाहेर जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
न्यूझीलंड क्रिकेटर जेसी रायडर याला एका बारबाहेर जबर मारहाण झाली होती. यामुळे त्याची कवटी तुटल्यानं त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. रेडिओ न्यूझीलंडनं हे वृत्त दिलं होतं. ख्राइस्टचर्चमधल्या एका बारमधून बाहेर पडल्यानंतर रायडरची एका गटाशी बाचाबाची झाली. चौघांनी त्याला जबर मारहाण केली.
तो पूर्वी आयपीएलच्या पुणे वॉरिअर्स संघात होता. ताज्या ऑक्शनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघानं रायडरला 2 कोटी 6 लाख डॉलर्सना विकत घेतलं होतं.