www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गतवर्षी वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षारक्षकाबरोबर धिंगाणा घालणाऱ्या शाहरूखवची बंदी कायम असल्याने त्याला वानखेडेवर आता जाता येणार नाही.
आयपीएल स्पर्धेत ‘मुंबई इंडियन्स विरुद्ध ‘कोलकाता नाईट रायडर्स’ यांच्यात झालेल्या टी-२० लढतीत शाहरुखने सुरक्षारक्षकांशी हुजत घालत गैरवर्तन केले होते. त्याच्या या निषेधार्ह कृतीनंतर मुंबई क्रिकेट संघटनेने गेल्या वर्षी १८ मे रोजी अध्यक्ष तत्कालीन विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ‘एमसीए’च्या व्यवस्थापन समितीने निर्णय घेऊन शाहरुखवर पाच वर्षांची प्रवेशबंदी घातली होती.
शाहरुख याच्यावर असलेली पाच वर्षांची बंदी कायम असणार आहे, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) सचिव नितीन दलाल यांनी स्पष्ट केले. शाहरूखच्या बंदीला एक वर्ष झाले असल्यामुळे यापुढेसुद्धा ही बंदी कायम राहणार आहे, असे दलाल म्हणाले. दरम्यान, संघटनेचे अन्य एक संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनीसुद्धा शाहरुखवरील बंदी कायम असल्याचे स्पष्ट केले.