www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मानव हा निसर्गाची अदभूत अशी निर्मिती आहे. माणसाचा स्वभाव राग, लोभ, मोह, माया हे पैलूंना अनेक प्रकारे घडवण्यात आलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे मानवाच्या विकासाची प्रक्रिया निरंतर आहे तिला सतत तेजाची धार मिळतेय.
तुम्हाला माहितच आहे की गोड फळांनाही किड लागली तर ती संपूर्ण फळ नष्ट करून टाकते त्याचप्रमाणे मानवातही ही कीड आहे. ही कीड म्हणजे इर्ष्या... होय, हीच इर्ष्या होत्याचं नव्हतं करून टाकते. इर्ष्या म्हणजे दुसऱ्यांच्या यशावर जळफळाट होणं किंवा दुसऱ्यांकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे नाहीत म्हणून त्या गोष्टीचा दुस्वास करणं.
इर्ष्येचा दुसरा अर्थ आहे की आपण स्वत:ला दुसऱ्यांहून हिन समजतो आणि दुसऱ्यांप्रमाणे न होऊ शकल्याने आपण त्यांच्यावर जळफळाट व्यक्त करतो. इर्ष्या करणारी लोक आपल्या कमतरतेकडे लक्ष देण्याऐवजी आणि त्या सुधारण्याऐवजी दुसऱ्यांचं काम कसं कमी करता येईल याकडे लक्ष देतात. यामुळे अनेकदा दुसऱ्यांचं नुकसानही होतं.
इष्येचा जन्म बऱ्याचदा लहानपणीच होतो जेव्हा आपलं प्रेम इतरांमध्ये वाटलं गेल्याची भावना आपल्या मनात निर्माण होते. काही व्यक्तींना विनाकारण आपण आपला शत्रू मानण्यास प्रारंभ करतो. पण, याच इर्ष्यालू व्यक्तींना आपल्यातला कला-गुणांची जाणीव मात्र लवकर होत नाही. आपल्या अडचणींमध्ये आणि दु:खामध्ये वाढ करण्यात इर्ष्येचा मोठा हात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.